छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी जानवली येथे भव्य शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी जानवली येथे भव्य शिबीर सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी जानवली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राधेश्याम बँक्वेट अँड लॉन्स, मुंबई-गोवा महामार्ग, कृष्णनगरीजवळ, जानवली येथे संपन्न होणार आहे. या शिबिरास खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, ॲड. निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके, वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे, देवगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजना, महसूल विभागाच्या सेवा, आवश्यक प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा, आरोग्य सुविधा तसेच विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, हा या अभियानामागील प्रमुख हेतू आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक तसेच विविध योजनांचे पात्र लाभार्थी यांनी या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानात' मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवलीचे उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'