पोलीस मुख्यालय येथे कोटपा 2003 व एफसीटीसी 5.3 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालय प्रशिक्षण हॉल येथे दिनांक 8 जुलै 2026 रोजी कोटपा 2003 व एफसीटीसी 5.3 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या कार्यशाळेस गृह उपअधीक्षक विकास बडवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा 2003 कायदा या विषयी त्या मध्ये कलम 4, कलम 6(अ), 6 (ब), तसेच कलम 5.7.8 या कलमान्वये सविस्तर माहिती आली. एफसीटीसी 5.3( WHO Framework Convention on Tobacco Control) या बाबत जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समिती यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व तंबाखूमुक्त शाळा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्मीस आल्मेडा यांनी तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. या कार्यशाळेला यशस्वी करण्याकरिता जिल्हा सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ता कार्मीस आल्मेडा, अनिल गुंजे विभागीय व्यवस्थापक मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे गणेश उगले व योगेश उगले यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.
00000
Comments
Post a Comment