कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 : मौजे कुणकवण येथील कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण संचय पातळीपर्यंत भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून वाघोटन नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पटबंधारे विभागाचे पुरनियंत्रक संपर्क प्रमुख तथा उपकार्यकारी अभियंता कुणाल जाधव यांनी केले आहे. कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये सन 2015 पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असून धरणाची कमाल संचय पातळी 90.10 मीटर आहे. दि. 5 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता धरण पूर्ण संचय पातळीपर्यंत भरल्याने सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीचा विचार करता व हवामान खात्याच्या अनुमानानुसार अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाला द्वारविरहित सांडवा असल्यामुळे पर्जन्यमानानुसार विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे वाघोटन नदीची पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी पावसाळा संपेपर्यंत नदीपात्रात उतरू नये आणि आवश्यक ती सावधानता बाळगावी. संभाव्य जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घ्यावी. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'