तिलारी धरणातून पाणी विसर्गाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या (ROS) व (GOS) नुसार दि. 24 जुलै 2026 रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरण परिसरासह बाहेरील पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून खरारी नाल्यासह विविध प्रवाहांमधून येणारे पाणी तिलारी नदीत मिसळणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
दिनांक 24 जुलै 2026 पासून पुढील कालावधीमध्ये नदी पात्रातील प्रवाह कधीही वाढु शकतो तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी. तसेच रात्रीच्या वेळी नागरीकांनी नदीपात्रातून ये-जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. नदीकाठच्या व इतर सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवरुन गावात दवंडी देवून सतर्कता बाळगावी.
0000000
Comments
Post a Comment