ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) 20 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध केलेल्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचीत सन्मान व्हावा यासाठी “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी या पुरस्कारासाठी आपले अर्ज दिनांक 28 जुलै 2026 पूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कुडाळ येथे पाठवण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व उद्योगाच्या वृध्दीसाठी, उदयोगाला चालना व गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर व खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रविंद्र कुडाळकर बिल्डिंग, 2 रा मजला, पंचायत समिती नजिक, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. dviosindhu@rediffmail.com संपर्क क्रमांक - ०२३६२-२२२२२० येथे संपर्क करण्याचे आवाहनही प्रसिध्दीपत्रकात केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'