पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण आवश्यक

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडील 4008 व राष्ट्रीयकृत, ग्रामिण बँकांकडील 2703 कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच टप्प्याटप्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाचा यात समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाईल. थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास, एकवेळ समझोता योजनेनुसार उर्वरित रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाकडुन आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पात्र यादीतील शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक / फार्मर आयडी क्रमांक व आधार क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर किंवा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुका शाखा कार्यालयात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'