भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे येथे सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांची भरती
सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील निवृत्त झालेले हवलदार व तत्सम पदावरील माजी सैनिकांना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे येथे सुरक्षा रक्षक या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र माजी सैनिकांनी शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर www.bel-india.in येथे जाऊन विहित मुदतीत ऑनलाइन नोंदणी करावी.
भरतीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा 02362-228820/8219285788 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
0000000
Comments
Post a Comment