पालकमंत्री नितेश राणे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष आरोग्य शिबिराला भेट; रुग्णालयीन व्यवस्थेचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जिमाका):- पालकमंत्री नितेश राणे यांनी आज स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित विशेष आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली. पालकमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री श्री. राणे यांनी स्तन कर्करोग तपासणी शिबिर, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी शिबिर, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिर तसेच नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. पालकमंत्री यांनी अधिष्ठाता समवेत सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली आणि महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णालयीन व्यवस्था तसेच अध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच अधिपरिचारीका यांच्या रिक्त पदाचा आढावा घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'