जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी,दि. 7 (जिमाका):- जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वःउत्पन्न तसेच शासनाच्या विविध योजना, उपक्रम व जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार व प्रचार करणाऱ्या पत्रकारांना गौरविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पत्रकार पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दि. 20 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे प्रारूप व स्वरूप निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या मान्यतेने गठित करण्यात आलेल्या समितीची सभा दि. 29 जून 2026 रोजी पार पडली. या सभेत जिल्ह्यातील अधिकाधिक पत्रकारांनी या पुरस्कार योजनेत सहभाग नोंदवावा, स्पर्धा अधिक व्यापक व दर्जेदार व्हावी आणि योजनेचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य व्हावा, या हेतूने प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने इच्छुक पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 20 जुलै 2026 पर्यंत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नसल्याने पात्र पत्रकारांनी मुदतीत अर्ज सादर करून या पुरस्कार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'