वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या (Medical Abortion) गोळ्यांची अनधिकृत व नोंदणीकृत वैद्यकीय तज्जांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय जर विक्री होत असेल तर ही गंभीर बाब असून यामुळे महिलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा गोळ्यांची खरेदी किंवा वापर स्वतःच्या मनाने अथवा प्रिस्क्रिप्शनशिवाय करू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. वैद्यकीय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच करणे कायदेशीर व सुरक्षित आहे. प्रिस्क्रिप्शनशियाय अशा औषधांचा वापर केल्यास अतिरक्तस्त्राव, अपूर्ण गर्भपात, गंभीर संसर्ग, भविष्यातील प्रजननक्षमतेवर परिणाम तसेच महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्री परवाना धारकांनी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केवळ वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच करावी. प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा नियमबाह्य पद्धतीने अशा औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरुद्ध लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अनधिकृत ठिकाणांहून अथवा कोणाच्याही सल्ल्याने गर्भपाताच्या गोळ्या विकत घेऊ नयेत. सुरक्षित व कायदेशीर वैद्यकीय गर्भपातासाठी शासनमान्य आरोग्य संस्थांशी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय गर्भपात केंद्रांमध्ये व स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. महिलांचे आरोग्य संरक्षण, सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवा उपलब्ध करून देणे तसेच बेकायदेशीर गर्भपातास प्रतिबंध करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी या बाबतीत जागरूक राहून नियमांचे पालन करावे व अशा औषधांची बेकायदेशीर विक्री अथवा संशयास्पद प्रकार आढळल्यास आरोग्य विभाग किंवा अन्न व औषध प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'