डाक पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का): मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल,मुंबई यांच्या वतीने पोस्टल विभागातील पेन्शनधारक/ कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी पोस्टल पेन्शन अदालत दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या डाक पेन्शन अदालत मध्ये पोस्ट विभागातून सेवानिवृत्त/ सेवेत असताना मृत्यू झालेल्यांना विनवृत्ती वेतन लाभांबाबतच्या तक्रारी टपाल विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील निवृत्तीवेतनधारक,जे 3 महिन्यात निकाली निघाले नाहीत, अशा तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतली जाणार आहे. निव्वळ कायदेशीर मुद्यांच्या समावेश असलेली प्रकरणे म्हणजे उत्तराधिकार, काल्पनिक पेन्शन, टीबीओपी/ एमएसीपी पदोन्नती, वेतन वाढवणे आणि शिस्तभंगाची प्रकरणे ज्यात धोरणात्मक बाबी आहेत. डी.पी.सीसाठी पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे पेन्शन अदालतमध्ये विचारत घेतली जाणार नाहीत. पेन्शनधारकांनी वैयक्तिकरित्या तक्रार(मोठ्या प्रमाणात किंवा इतरांच्या वतीने नाही) लेखा अधिकारी, सचिव पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ बिल्डींग, 2 रा मजला मुंबई 400001 वर संलग्र केलेल्या प्रोफॉर्मामध्ये तीन प्रतिलिपीत दि. 22 ऑगस्ट 2022 पर्यंत पाठवावी किंवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. नंतर प्राप्त झालेले अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये विचारात घेतले जाणार नाहीत. अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'