जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 80 योजनांच्या 70 कोटी 47 लाख रुपयांस प्रशासकीय मान्यता
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) – जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या आजच्या बैठकीत प्रस्तावीत 80 योजनांच्या 70 कोटी 47 लाख निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वाडा गावाच्या वैयक्तिक योजनेस समितीची शिफारस घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आजच्या बैठकीत दिली.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, मजिप्रचे उपकार्यकारी अभियंता एम.आर.चिटणिस, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यु.आर. महाजनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर आदी उपस्थित होते.
श्री. सावर्डेकर यांनी सुरुवातीला सद्यस्थितीची माहिती दिली. एकूण 431 ग्रामपंचायती असून देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या 1 लाख 25 हजार 111 इतकी आहे. सन 2022-23 च्या कृती आराखड्या नुसार 733 योजना आहेत. त्याची किंमत 330.69 कोटी इतकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांवर झालेला खर्च 8.10 कोटी इतका असून कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या 188 योजना आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनःर्रचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत 'हर घर नल से जल' प्रमाणे पाणीपुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रगतीपथावर असणाऱ्या योजनांची कामे पूर्ण करून या मिशनअंतर्गत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्य.
00000
Comments
Post a Comment