देवघर धरणाचे दरवाजे सायं 4 वा. उघडणार देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरु असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरणाच्या व्दारे परीचलनाच्या कार्यक्रमानुसार सध्यस्थितीत दि. 1 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये धरणामध्ये तलांक 184.00 मी.पातळीपर्यंत पाणीसाठा करावयचा आहे. सध्यास्थितीत धरणाची पाणीपतळी 185.00 मी. इतकी झाली असून ती विहित मर्यादेपेंक्षा जास्त झाल्याने व पाऊस सुरु असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकतेनुसार उघडावे लागणार आहेत. यासाठी दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4 वा. धरणाचे दरवाजे अंदाजे 5 ते 10 सेमी ने उघडण्यात येत आहेत. त्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना इशारा देण्यात येतो की, जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी,याची नोंद घ्यावी. असे आवाहन आंबडपाल-कुडाळचे मध्यम प्रकल्प विभागीय पथक, कार्यकारी अभियंता हर्षद यादव यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'