मधकेंद्र योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मधमाशा पालनाला मोठा वाव आहे. मधमाशामुळे शेती फायदेशीर होण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. शेती उत्पन्नात वाढ होत अशल्याने मध उद्योगाला जास्तीत जास्त चालना देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी स्वतंत्र असा मध उद्योग केल्यास वर्षाकाठी या उद्योगातून किमान 5 ते 10 लक्ष रक्कमेची उलाढाल होऊ शकते.
या योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष ( छंद ) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती.
योजनेतील प्रमुख घटक व पात्रता. वैयक्तीक मधपाळ, केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ. अधिक माहितीसाठी आनंद कर्णिक, जिल्हा ग्रमोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, पंचायत समिती कुडाळ, दुरध्वनी – 02362-222220, 9975468439 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment