लोक अदालतमध्ये 208 प्रकरणे निकाली

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,यांनी दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतमध्ये एकुण 3498 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 208 प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. लोक अदालत ही प्रत्यक्ष तसेच मिश्र स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. लोक अदालतमध्ये संपूर्ण जिल्हयात एकुण 3498 एवढी प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 208 एवढी प्रलंबित प्रकरणे निकाली झाली. त्यापैकी 3 प्रकरणे आभासी पध्दतीने निकाली झाली. या प्रकरणा मध्ये 3,15,39,299/- एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. या लोक अदालती मध्ये 5991 वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती व त्यापैकी 300 प्रकरणे निकाली झाली व त्यामध्ये 31,25,764 एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.व्ही.हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यामध्ये एकुण 15 पॅनल ठेवण्यात आलेली होती. जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी एकुण चार पॅनेल ठेवण्यात आली होती. पॅनेल प्रमूख म्हणून जिल्हा न्यायाधीश -1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.जोशी, दिवणी न्यायाधीश(व.स्तर) ए.बी.कुरणे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम. फडतरे व सहायक धर्मादाय आयुक्त एम.एस. निकम यांनी काम पाहीले. या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ आर.व्ही. रावराणे व महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सीलचे सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी विशेष प्रत्यन्त केले व जिल्ह्ययातील सर्व वकीलांनी संपुर्ण सहकार्य दिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर यांनी या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करणासाठी मदत करणारे जिल्ह्यातील सर्व विधिज्ञ. जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी, जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व कर्मचारी सर्व,सर्व पत्रकार व पक्षकार यांचे आभार मानले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'