भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : सन 2021-22 करीता शिष्यवृत्ती अर्ज भरण्यसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनंअंतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 14 12 2021 पासून शासनाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अद्यापही अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासर्वीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील अनु. जाती प्रवर्गातील शिष्यवत्तीचे अर्ज भरण्यासाठी 13 ऑगस्ट 2022 पर्यंत व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दि. 25 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाल कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे. जिल्हयातील सर्व महाविदयालय व विद्यार्थ्यांना अवाहन करण्यात येते की, ज्या अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अदयापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नाहीत, अशा अनु.जाती विद्यार्थ्यांनी दि.13.08.2022 पर्यंत व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.25.08.2022 पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी. तसेच सन 2020-21 वर्षामधील अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी रिअप्लाय अर्ज करण्यासाठी 13.08.2022 पर्यंत व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.25.08.2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली असल्याने तात्काळ शिष्यवृत्तीच्या अर्जांचे नुतनीकरण करावेत. विहीत वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यायाची आहे. या योजनेपासून अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याची दक्षता घेण्यात यावी असे आवाहन समाज कल्याण विभगाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करण्याबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय च्या दुरध्वीनी क्र02362 228882 येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री साळे यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'