आजादी का अमृत महोत्सव अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची रॅली

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : स्वातंत्रत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सकाळी 8. वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्काऊड गाईड व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कुल ओरोस, डॉन बॉस्को हायस्कुल,ओरोस च्या शालेय विद्यार्थ्याची रॅली जिल्हा क्रीडा संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोस पर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला व देशभक्तीपर घोषणा दिल्या. उपक्रमांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल मधील उदय जांभवडेकर, डॉ. प्रशांत कोलते, डॉ. आईर, डॉ.परब तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक हेमंतकुमार चव्हाण या मान्यवराची उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'