माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना 15 टक्के गुणांची सवलत
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. व नावातील स्पेलिंग बदल व जात संवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांनाकडून निवेदन प्राप्त होत आहेत. अमेदवारांच्या नावातील स्पेलिंग जात संवर्ग बाबतची दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करण्यासाठी व माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता सुविधा https://mahatet.in या संकेत स्थळावरील उमेदवारांचया लागिन मध्ये देण्यात आलेली आहे. निवेदन 10 ऑगस्ट 2022 पर्यंत देणे आवश्यक आहे.
नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एस.एस.सी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र, माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी ईमेलव्दारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुनश्य: आपले लॉनिग मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
मदती नंतर अन्य प्रकारे (ईमेल, फोनसंदेश, लेखी पत्र इत्यादी) आपलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार परीक्षा निकाल https://mahatet.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment