तंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे खेळांचे प्रात्यक्षिक
सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात खेळाचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देशाने नाग्या महादू आदिवासी निवासी वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे वेटलिफ्टींग व पॉवरलिफ्टींग या खेळांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांमध्ये प्रथम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने वेटलिफ्टींग या खेळांचे पॉवरपॉइंट प्रझेटेशन दाखवण्यात आले. त्यानंतर स्वत: जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस व तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रात्यक्षिक करुन दाखवली . उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायन व रोप मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली, रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधन कार्यक्रमही उत्साहात पार पडला. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी राजा शिवाली विद्यालय, हिर्लोक या शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व विशद केले. या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष विजय जांभवडेकर यांचे सहकार्य लाभले,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
0000
Comments
Post a Comment