गस्ती नौका कार्यान्वित करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): सन 2022-23 करीता महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी गस्ती नौका भाडेतत्वावर घेण्याबाबत ई –निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन गस्ती नौका उपलब्ध होईपर्यंत सन 2022-23 करीता जिल्हा कार्यालय स्तरावर दि.1 ऑगस्ट 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता तात्पुरत्या गस्ती नौका उपलब्ध करुन घेण्यास मान्यता दिली आहे. तरी जिल्ह्यासाठी स्थानिक व्यवस्था करुन गस्ती नौका कार्यान्वित करण्याकरीता अर्ज व दरपत्रक मागविण्यात येत आहेत. तरी अधिनस्त नौकामालकांना याबाबत तात्काळ अवगत करुन गस्तीकामी नौका उपलब्ध करुन देण्यास इच्छुक असलेल्या नौका मालकांनी दिकांक 10 ऑगस्ट 2022 पुर्वी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) कार्यालयसास सादर करण्यात यावे. नौका गस्तीकामी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित नौकामालकांनी अटी- शर्तीची पुर्तता होणे आवश्यक आहे, कृपया याची नोंद घ्यावी. अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त र.ग.मालवणकर यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'