स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा मुख्यालय परिसरात स्वच्छता कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासकीय संकुल परिसरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवडा, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. थोरात यांच्यासह जिल्ह्या मुख्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कणकवली नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही आजच्या या स्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील प्लास्टिक, इतर कचरा स्वच्छ केला. तर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्रास कटरच्या सहाय्याने वाढलेले गवत काढून परिसर स्वच्छ केला. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'