जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सामुहिक राष्ट्रगीत गायन
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम / कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शाळा/विद्यापीठ महाविद्यालय/शैक्षणिक संस्था तसेच सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment