8 सप्टेंबर पर्यंत नत्रदान पंधरवडा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टि क्षीणता कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी (25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ) राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 37 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करावाचा असून त्याचे घोषवाक्य ‘Let Your Eyes Live on’ तुमचे डोळे जगू द्या असे आहे. नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजु अंध व्यक्तींना दृष्टि येण्यासाठी आपल्या मृत्युनंतर दान करणे होय. नेत्रदानाचा अर्ज भरुन नेत्रदान करता येते. नेत्रदात्यास जेव्हा मृत्यू येईल. तेव्हा नातेवाईकांनी अविलंब जवळच्या सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. डॉक्टर येण्यापूर्वी नेत्रदात्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन घ्यावे. मृतदेह ज्याठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे खोलीत एसी असल्यास सुरु ठेवावा. जेणे करुन मृत व्यक्तीचे डोळे कोरडे पडणार नाही. तसेच डोळे बंद करुन डोळ्यावर ओले स्वच्छ कापड ठेवावे. नेत्रदानामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यास विद्रुपता येत नाही. नेत्रदान हे कृत्य धर्मविरोधी नाही तसेच नेत्रहिनाला दृष्टी देण्यासरखे महान कार्य कोणतेळी नाही. लोकांनी समाजामध्ये नेत्रदान विषयी जास्तीत जास्त जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'