स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा’’ या उपक्रमार्तगत समाज कल्याण विभागा मार्फत विविध कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा’’ हा उपक्रम सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविणेत येत असून कार्यालयच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळामध्ये, महामंडळे येथे स्वच्छता अभियान मोहीमेद्वारे कार्यालयाच्या परिसरातील साफसफाई व स्वच्छता करण्यात आली.व वृक्षरोपण करण्यात आले. व्यसन मुक्ती संकल्पामध्ये अमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा घेण्यात आली.
या उपक्रमामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, प्रमोद जाधव,यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
0000
Comments
Post a Comment