राष्ट्रीय क्रीडा दिनानिर्मित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : भारतातील खेळांच्या परंपरेचे प्रतिक म्हणून हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षी ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू यावर आधारित चित्ररथ काढण्यात येणार आहे. कासार्डे हायस्कुल कासार्डे, आणि कनेडी हायस्कुल कनेडी,विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
0000
Comments
Post a Comment