जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सामुहिक राष्ट्रगीत गायन

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.)-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत उद्या बुधवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात एकाच वेळी समुह राष्ट्रगीत गायन होणार आहे. तरी प्रशासकीय इमारत मधील सर्व अधिकारी - कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांना अवगत करावे. तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी याबाबत शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यांना अवगत करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'