स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत सायकल रॅलीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा माहिती कार्यालय, स्काऊड गाईड व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोस फाटा व तेथून परत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment