स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानांतर्गत सायकल रॅली सहभागी सायकलस्वारांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा माहिती कार्यालय, स्काऊड गाईड व रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 8 वा. सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर सहभागी सायकलस्वारांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
क्रीडा संकुल चौकापासून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' अशा जय घोषात ही सायकल रॅली शासकीय रुग्णालय, रानबांबुळी मार्गे ओरोस फाटा, जिजामाता चौक ते गरुड सर्कल मार्गे पुन्हा क्रीडा संकुल चौकात परत आली. या ठिकाणी पुन्हा भारत माता की जयच्या जयघोषात या रॅलीची सांगता झाली. याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अपर कोषागार अधिकारी यशवंत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गचे उदय जांभवडेकर, व रेन्बो रायडर्स सायकलिंग क्लबचे बापू परब, सिद्धांत सावंत, सिद्धार्थ परब, पथमेश सावंत, डॉ. आईर, भालचंद्र सावंत, उल्हास पालव, सायकलिस्ट असोसिएशनचे गजानन कांदळगावकर, रुपेश तेली तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.
* सोबत फोटो जोडला आहे.
00000




Comments
Post a Comment