स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कारागृहात विविध कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा कारागृह वर्ग – 1 येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बंद्यांसाठी समुपदेशन, रक्षाबंधन, वृक्षारोपण यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.
दि. 8 ऑगस्ट रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय, कुडाळ या सेवाभावी संस्थेच्यावतीने कारागृहातील बंद्यांसाठी रक्षाबंधनाचे आयोजन केले होते. तसेच यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा दिदी यांनी बंद्यांचे समुपदेशन केले. तर दि. 11 रोजी मेडीकल मिशन फाऊंडेशन, सावंतवाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कारागृह अधिक्षक हरिश्चंद्र श्रीरंग जाधवर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र टोनगे ब्रह्मकुमारी स्वाती दिदी, अजय भाई आदींसह मेडीकल मिशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याच दिवशी कारागृहाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.व्ही. हांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रामधअये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दायती लोककला संवर्धन, अकादमी संस्थआ पिंगुळी, यांच्या मार्फत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी मनोरंजनाच्या माध्यमातून संस्कृती, देशभक्ती, जनजागृती व प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment