राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावंतवाडी येथील राष्ट्रीय खेळाडू केशर निगुर्णला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 5 वर्षातील राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लगंडी या पारंपारिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या, मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा घेऊन त्यांच्या जीवनावरील व हॉकी खेळात केलेल्या कामगिरीचा लघुपट दाखवण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे 650 विद्यार्थांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांच्यामार्फत शालेय स्तरावर कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. न.शा.पंतवालावलकर महाविद्यालय, देवगड येथे रस्सीखेच स्पर्धा घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्या शिरस यांनी दिली . 0000 --

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'