स्वामित्व योजनंअंतर्गत कामासाठी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेअंतर्गत ड्रोन सर्व्हे व इतर अनुषंगिक कामकाजासाठी भूमि अभिलेख विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यानी यांच्या सेवा आवश्यक आहे. स्वामित्व ( गावठाण जमाबंदी प्रक्ल्प ) योजनेअंतर्गत इच्छुक असलेल्या भूमी अभिलेख विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांनी आपले अर्ज, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत. ए विंग, दुसरा मजला सिंधुदुर्गनगरी या पत्यावर अर्ज सादर करावित. या योजनेअंतर्गत कामासाठी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द विभागीय चौकशी चालू नसावी. तसेच त्यांचे वय 65 वर्षांचे आत असणे आवश्यक आहे. संबंधीताच्या सेवा शासनाकडील वेळोवेळी पारित केलेल्या प्रचलित शासन निर्णय/अटी/शर्तीची पूर्तता केल्यानंतर घेण्यात येतील व सदर प्रक्रिया कधीही कोणत्याहीटप्यावर रद्द करणे,त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांना असेल असे जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेखाचे अधिकारी डॉ. विजय वीर यांनी स्पष्ट केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'