महिला व बाल विकस विभागात विविध पदांची भरती
सिंधुदुर्गनगरी, दि. 11.(जि.मा.का): जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील – विधी तथा परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, डाटा विश्लेषक, लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, क्षेत्रीय कार्यकर्ता तसेच बाल न्याय मंडळ येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी एकुण -7 रिक्त पदे भरावयाची आहेत.
उमेदवारांनी www.wcdcommpune.com या संकेस्थळावर ऑनलाईन पध्दीतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2022 रात्री 11.59 वाजेपर्यंत असेल. जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त स्थानिक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दीने विहित वेळेत अर्ज करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.
एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत 36 जिल्ह्यामधील जिल्हा बाल संरक्षण कक्षातील विविध रिक्त पदे व बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची रिक्त पदे 11 महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पध्दीने भरण्यासठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यानिहाय रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता इतर अटी व शर्ती व सविस्तर माहितीसाठी अर्जाचा नमुनासाठी या www.wcdcommpune.com संकेतस्थाळाचा लाभ घ्यावा असे श्री. रसाळ यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment