स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 ते 15 ऑग्स्ट 2022 या कालावधीत स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले आहेत. नाग्यामाधु आदिवासी वसतिगृह वेताळबांबर्डे येथे दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता वेटलिफ्टींग व पॉवरलिफ्टींग या खेळांची प्रात्यक्षिके आयोजन करण्यात आले आहे . जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोस फाटा व तेथून परत, शालेय विद्यार्थ्यांची रॅलीचे आयोजन दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे. दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता सायकल रुलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ओरोज फाटा व तेथून परत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी, येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'