PLI व RPLI सेवांसाठी १ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आर्थिक व्यवहार बंद राहणार नवीन सॉफ्टवेअर प्रणालीत स्थलांतर; ग्राहकांनी व्यवहारांचे नियोजन करण्याचे डाक विभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २७ (जिमाका) : डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) सेवांसाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या McCamish या सॉफ्टवेअरचे नवीन Insurance Management Solution (IMS) प्रणालीमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने रविवार, दि. १ नोव्हेंबर ते रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत PLI व RPLI सेवांसाठी ‘नो ट्रान्झॅक्शन डे’ घोषित करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व पोस्ट ऑफिसमधील काउंटरवर डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विम्याशी संबंधित कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच, या सेवांशी संबंधित ऑनलाइन सुविधाही उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे PLI व RPLI पॉलिसीधारक आणि ग्राहकांनी आपल्या विमा पॉलिसींशी संबंधित आवश्यक आर्थिक व्यवहार १ नोव्हेंबरपूर्वी किंवा ८ नोव्हेंबरनंतर पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'