अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी

सिंधुदुर्ग, दि. २७ (जिमाका) : प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रती थेंब अधिक पीक) अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्यासाठी खालीलप्रमाणे पूरक अनुदान देण्यात येते आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील सर्व प्रगतशील व गरजू शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत २५ टक्के आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत १० टक्के, असे एकूण ९० टक्के अनुदान दिले जाते. तसेच, २ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या बहुभूधारक व इतर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत ३० टक्के आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत १५ टक्के, असे एकूण ९० टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जवळच्या सेतू केंद्रात भेट द्यावी. तसेच शेतकऱ्यांनी तात्काळ आपले कागदपत्रे घेऊन महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'