महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्ग, दि. ५ (जिमाका): महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक ९ ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजता सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. दुपारी १ ते २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी निवारणाकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक होणार असून, आढावा बैठकीनंतर अध्यक्षांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी २ ते ३ वाजता (राखीव). सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्ग येथून मुंबईकडे प्रयाण. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'