‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे ५ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आयोजन

सिंधुदुर्ग, दि. ३१ (जिमाका) : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘विकसित भारत@२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने ‘विकसित भारत युवा संसद २०२६’चे आयोजन करण्यात येत आहे. माय भारत (MY Bharat), सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे ही युवा संसद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या नव्या स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश देशातील युवकांना लोकशाही प्रक्रियेशी जोडणे, त्यांच्यामध्ये संसदीय कार्यपद्धतीविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच राष्ट्राच्या विकास प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे. यंदाच्या युवा संसदेचा चर्चेचा मुख्य विषय ‘एक देश, एक निवडणूक’ (One Nation, One Election) असा आहे. या विषयाच्या अनुषंगाने युवकांना आपले विचार, मते आणि दृष्टिकोन संसदीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळणार आहे. या युवा संसदेत सहभागी होण्यासाठी १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक पात्र आहेत. वयाची गणना करण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ ही तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील युवा संसदेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेले स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवकांनी नोंदणीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा. तसेच अधिक माहितीसाठी माय भारतच्या mybharat.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'