दोडामार्ग येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण पशुधनाच्या आरोग्यसेवांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध

सिंधुदुर्ग, दि.१६ : जिल्ह्यातील दोडामार्ग येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीमुळे परिसरातील पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. दोडामार्ग येथील या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या कामासाठी ७२ लाख ६८ हजार रुपये खर्च झाला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, २८ मे २०२६ रोजी तिचे हस्तांतरण करण्यात आले होते. या दवाखान्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील पशुधनाच्या आरोग्यसेवांना बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, पशुसंवर्धन उपयुक्त समीर बिलोलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर उपस्थित होते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'