पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेंतर्गत अर्ज करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग, दि. १४ (जिमाका) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेंतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेंतर्गत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील धनगर समाजाच्या (एनटी-सी) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लाभ घेता येणार आहे. बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित पद्धतीने ऑफलाइन अर्ज भरून सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथे दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमा करावेत. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजनेंतर्गत उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'