जिल्हा कोषागार अधिकारी पदीचा कार्यभार अरुणा हसबे यांनी स्वीकारला

सिंधुदुर्ग, (जिमाका) दि. १: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहाय्यक संचालक संवर्गातील सहाय्यक संचालक अरुणा लक्ष्मणराव हसबे यांची प्रशासकीय बदली वित्त विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथून जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी आज दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग या पदाचा कार्यभार स्वीकारला. श्रीमती हसबे यांनी जिल्हा कोषागार अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर कार्यरत होत्या. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर येथे अपर कोषागार अधिकारी तसेच प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर या पदांवर कामकाजाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे कोषागार कार्यालयातील विविध कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्गच्या कामकाजासाठी लाभ होणार आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'