न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील व पक्षकारांसाठी ९ ऑक्टोबरला मोफत नेत्र तपासणी शिबिर

सिंधुदुर्ग,(जिमाका) दि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी (गट-क) संघटनेच्या वतीने न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील आणि पक्षकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा न्यायालय संकुल, सिंधुदुर्ग, ओरोस येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या शिबिरात ६० वर्षांवरील पक्षकारांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'