शासकीय निरीक्षणगृह व बालगृहाच्या तपासणीसाठी अशासकीय सदस्याची नियुक्ती पात्र व इच्छुक उमेदवारांनी २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्ग, दि. १३ (जिमाका) : ओरोस येथील नोंदणीकृत शासकीय निरीक्षणगृह व बालगृहाच्या तपासणीसाठी बाल हक्क, काळजी, संरक्षण व कल्याण क्षेत्रात कार्यरत नागरी समूहातील एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सदस्याचा कार्यकाळ नियुक्तीपासून तीन वर्षांचा राहणार आहे. या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती किमान पदवीधर असणे आवश्यक असून, तिला बाल हक्क, काळजी व संरक्षण क्षेत्रातील किमान दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दि. २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, प्रशासकीय इमारत, ए विंग, तळमजला, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे अर्ज सादर करावेत. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार करण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय संस्था तपासणी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी आणि समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'