शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग, दि. ५ (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रिक्त असलेल्या जागांवर मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या वेबपोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शासकीय वसतिगृहात सादर करणे आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड येथे मुलींची, तर मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला येथे मुलांची शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमधील रिक्त जागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास, इतर मागास तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ०२३६२-२२८८८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'