घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड मध्ये शुभारंभ

सिंधुदुर्ग, दि. ३१: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत रोजगार हमी व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत देवगड तालुक्यात कुणकेश्वर ग्रामपंचायात येथे शोषखड्डा कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी सरपंच महेश ताम्हणकर यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, तांत्रिक सहाय्यक सोनजी जोगल, ग्रामरोजगार सहाय्यक मंगेश मेस्त्री, व लाभार्थी सुभाष वाळके हे उपस्थित होते. शोष खड्डे व जलतारा यांसारख्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्यास मदत होणार असून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.गावाच्या विकासासोबतच नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीसमस्या दूर करण्यासाठी अशा प्रकारची कामे प्रत्येक गावात प्रभावीपणे राबविण्यात येत असून देवगड तालुक्यात घर तेथे शोषखड्डा अशी मोहीम राबविण्यात येत आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'