तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु -सहाय्यक आयुक्त सचिन साळे
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : तृतीयपंथीय व्यक्तीना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी व अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे कडून National Portal For Transgender Persons राष्ट्रीय पोर्टल सुरु करणेत आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी दिली.
या पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करणेबाबतची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुषंगाने तृतीयपंथी व्यक्तींना शासनाकडून लाभ देणेसाठी तृतीयपंथी व्यक्तींची सदर पोर्टलवर नोंदणी करणेबाबत शासनाने आदेशित केले आहे. तरी तृतीयपंथीयांची वैयक्तिक, निवास स्थलांतरण विषयक माहिती, शिक्षण विषयक माहिती व आवश्यक कागदपत्रे, कौंटुबिक व आर्थिक परिस्थिती विषयक माहिती, शासनाकडून लाभ मिळालेल्या योजना विषयक माहिती,आरोग्यविषयक माहिती इत्यादी माहिती त्वरीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे समक्ष भेट देऊन योजनेविषयक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत.कार्यालयाचा पत्ता. डॉ.बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन,सिंधुदुर्गनगरी (ओरोस) ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग.पिन कोड-416612 तसेच तृतीयपंथीय व्यक्तीसाठी काम करणाऱ्या संस्थेनी जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहचवून सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment