मेघ गर्जनेसह 2 ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता नागरिकांनी दक्षता घ्यावी - आविशकुमार सोनोने
सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जि.मा.का.) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची तसेच विजा चमकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 30 ते 40 कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आविशकुमार सोनोने यांनी केले आहे.
विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.
* संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
* दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
* नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
* विजेच्या खांबांपासून लांब रहावे.
* उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
* एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
* धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
* वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर दामिनी AAP डाऊनलोड करुन घ्यावे.
* पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
* मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी - 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी - 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी - 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी - 02362-222525, मालवाण तालुक्यासाठी - 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी - 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी - 02367-237239 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
* हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी.
* कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कोणत्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02362 - 228847 किंवा टोल फ्री क्रमांक - 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.
* हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.
00000
Comments
Post a Comment