जागतिक किडनी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी - डॉ. श्रीपाद पाटील
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) : जागतिक किडनी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे बुधवार दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जागतिक किडनी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये किडनीच्या रुग्णांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सध्या सर्वत्र तरुण वयातील व्यक्तीमध्ये किडनीचे आजार होण्यचे प्रमाण वाढलेले आहे तसेच वय झालेल्या व्यक्तीमध्येदेखील रक्तदाब, मधुमेह, इतर गंभीर आजार यामुळे किडनीचे आजार होत आहेत. या आजारावर किडनी बदलणे व किडनी डायलेसिस औषधोपचार केले जातात. या आजारासाठी जागजिक किडनी दिन सर्वत्र राबविण्यात येतो दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आनंदीबाई जोशी सभागृहात जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे किडनीच्या रुग्णांकरिता तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. त्याकरिता इच्छूक किडनीच्या आजाराचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment