सखी वन स्टॉपसेंटर कडून पीडित महिलेचा समुदेशनानंतर तिच्या आईकडे सुपूर्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) : कुडाळ येथील पीडीतेला तिच्या पतीने मारहाण करून घराबाहेर काढल्याने. पिडितेच्या सुरक्षेच्या दृष्टीने निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून दि.3 सप्टेंबर रोजी रात्री 12.45 वाजता कुडाळ पोलिसांनी पीडीतेला सखी वन स्टॉप सेंटरला दाखल केले. त्यानंतर पीडीत महिलेची MLC करून तिला आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले व तिचे समुपदेशन करून तिला 3 दिवस निवाऱ्याची सोय देण्यात आली. पीडित महिलेच्या सासरच्या व माहेरच्या लोकांना बोलावून त्यांचेही समुपदेशन करण्यात आले व दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी पीडीतेला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी सखी वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक ॲड. पुजा काजरेकर,समुपदेशक ॲड रूपाली प्रभू, केस र्वकर ॲड. मिनाक्षी नाईक, चैत्राली राऊळ. पॅरामेडिकल स्टॉफ नर्स स्नेहा मोरे व योगिता परब,पॅरालिगल लॉयर ॲड.सुवर्णा हरमलकर,आयटी स्टाफ आर.बी.साईल,मल्टी हेल्पर सरिता कुंभार, सुरक्षारक्षक देवेंद्र नाईक, अभिषेक मयेकर,विजय पांग्रडकर तसेच महिला समुपदेशन केंद्र कुडाळ चे समुपदेशक महेंद्र जाधव हे उपस्थित होते. तरी सदर केस कामी जिल्हा महिला व बाल विकासच्या विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे यांचे उत्तम व विशेष मार्गदर्शन मिळाले. सोबत: फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'