गटई कामगारांना पत्रा स्टॉल देण्याच्या योजनेचा पात्र लाभ घ्यावा,
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्त करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातानात बसून आपली सेवा जनतेला देत असतात. या व्यावसायिकांना उन,वारा व पाऊसपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती हावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहायक अनुदानावर गटई कामगारांना पत्राचे स्टॉल देण्याच्या योजना आहे. सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर गटई स्टॉल व संत रोहिदास चर्मयोग व चर्मकार विकास महामंडळामार्फत रक्कम रु.500/- रोख अनुदान देण्यात येते या योजनाचा पात्र लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन सचिन साळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यानी केले आहे.
योजनेच्या नियम व अट पुढीलप्रमाणे आहेत.अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासा व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाऱ्याच्या कुटुबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु.40,000/- व शहरी भागात रु. 50,000/- पेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड (कॅन्टोन्मेंट बोर्ड) किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किवा ती त्याच्या स्वमालकिची असावी.
तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करणेकरीता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी,या कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment