सखी वन स्टॉप सेंटर कडून पिडित महिला दोन्ही मुलींसह समुदेशनानंतर सुखरूप घरी रवाना
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथून आपल्या 2 मुलींसह पिडित महिला कुडाळ येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता आली. पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे तिचा नवरा सिंधुदुर्ग येथे काम करत असल्याने त्याच्या बोलावण्यावरून ती आपल्या मुलींसह इथे आली होती, परंतु पिडित महिलेचा तिच्या पतीशी कोणताही संपर्क न झाल्याने तिने मदतीसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिला व तिच्या लहान मुलींच्या सुरक्षितेसाठी व निवाऱ्यासाठी कुडाळ पोलिसांनी सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग येथे पिडित महिला व तिच्या मुलींना दाखल केले.
सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग ने सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश वन स्टॉप सेंटर शी संपर्क साधत सदर महिलेची माहिती कळविली व तिचाशी संबंधित माहिती मिळाल्यास सिंधुदुर्ग वन स्टॉप सेंटर शी संपर्क करण्यास विनंती केली. पोलिस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्गनगरी व पोलीस ठाणे कुडाळ यांची मदत घेऊन पीडितेच्या नवऱ्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर पिडित महिलेच्या गावाच्या सरपंचांशी संपर्क करून पिडित महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. सदर पिडितेला 5 दिवसांची निवाऱ्याची सोय, वैद्यकीय सेवा व समुपदेशन सेवा पुरवीत दि. 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वा. पीडिता व तिच्या मुलींना रेल्वेचे तिकीट काढून देत गाडीत बसविले. पीडिता दोन्ही मुलींसह सुखरूप तिचा घरी सिद्धार्थनगर,उत्तर प्रदेश येथे पोहोचली त्याबाबत तिने व तिथल्या सरपंचांनी सिंधुदुर्ग वन स्टॉप सेंटर यांना कळविले.
यावेळी सखी वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक ॲड. पुजा काजरेकर, समुपदेशक ॲड रूपाली प्रभु, केस र्वकर ॲड. मिनाक्षी नाईक, चैत्राली राऊळ, पॅरामेडिकल स्टॉफ नर्स स्नेहा मोरे व योगिता परब, पॅरालिगल लॉयर ॲड. सुवर्णा हरमलकर, आयटी स्टाफ आर.बी.साईल, मल्टी हेल्पर सरिता कुंभार, सुरक्षारक्षक देवेंद्र नाईक, अभिषेक मयेकर, विजय पांग्रडकर हे उपस्थित होते. सदर केस कामी जिल्हा महिला व बाल विकासच्या विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे यांचे उत्तम व विशेष मार्गदर्शन मिळाले.
०००००

Comments
Post a Comment